Dandguri High School Srivardhan : श्रीवर्धन तालुक्यात दांडगुरी हायस्कूल प्रथम

श्रीवर्धन प्रतिनिधि 
महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुदंर शाळा या अभियानाअंतर्गत माझी शाळा सुदंर शाळा उपक्रम श्रीवर्धन तालुक्यात राबविण्यात आला. स्पर्धेमध्ये खाजगी अनुदानित शाळा विभागात संस्थापक रा.पां. दिवेकर दांडगुरी हायस्कूल या विद्यालयाने श्रीवर्धन तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे सभापती श्री वसंत राऊत सदस्य अभय शेलार व दिलीप विचारे व इतर सर्व सदस्याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेच, विद्यालयातील मुख्याध्यापिका राजश्री सांबरे, संदीप तमनर, बाबुराव जगनर, पुष्पा गवळे, जयश्री पाटील, गणेश पाटील, रोहित पावशे व शिक्षकेतर कर्मचारी मुरलीधर कुलाबकर या सर्वांनी अगदी मनापासून स्वतः या उपक्रमात झोकून काम केले. त्याबद्दल सर्व श्रीवर्धन तालुक्यातून या विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक अभिनंदन केले जात आहे. यासाठी वेळोवेळी पंचायत समिती श्रीवर्धनचे कार्यकुशल गटशिक्षणाधिकारी श्री नवनाथजी साबळे साहेब व विस्तार अधिकारी श्री धामणकर व दांडगुरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री धुमाळे यांसारख्या वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा