Shreevardhan Panvel आनंद वार्ता : श्रीवर्धन पनवेल बससेवा लवकरच आपल्या सेवेत ; असे आहे वेळापत्रक

                 छायाचित्र : संग्रहित

टीम म्हसळा लाईव्ह
म्हसळा यादव गवळी समाज संघटना नवी मुंबई-पनवेल यांच्या माध्यमातून दि. २३ सप्टेंबर २०१३ रोजी संघटनेचे अध्यक्ष नरेश साबळे यांनी श्रीवर्धन आगारप्रमुख महिबूब अ मणेर यांची भेट घेऊन दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन श्रीवर्धन ते पनवेल आणि पुन्हा श्रीवर्धन अशी एसटीची बससेवा सुरू व्हावी, यासाठी मागणी केली होती. त्यानुसार सदर बस ही येत्या १ ऑक्टोबर २०२३ पासून शिवशाही बस सुरू करण्याचे आश्वासन आगारप्रमुख मणेर यांनी दिले. सदरची शिवशाही बस श्रीवर्धनहून दुपारी ३:०० वाजता सुटेल आणि परतीच्या प्रवासासाठी पनवेलहून रात्री १० वाजता श्रीवर्धनसाठी सुटेल. जास्तीत जास्त प्रवाशांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन आगारप्रमुख मणेर यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा