श्रीवर्धन(समीर रिसबूड)
नाभिक समाजासाठी एक ज्वलंत दिप तेवत ठेवणारे थोर समाजसुधारक संत श्री सेना महाराज यांची पुण्यतिथी श्रीवर्धन येथे सुनील नाना चाफेकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती.सकाळी दहा वाजता प्रतिमेचे पूजन झाल्यावर पोथी वाचन,आरती व भोजनाचा कार्यक्रम आटोपल्यावर शालेय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यजमान सुनील चाफेकर उभयंतांच्या हस्ते शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.अध्यक्ष विलास केशव कदम यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.यावेळी अजय चव्हाण,संदिप दिवेकर,अमोल कदम,सुरेंद्र भोसले,रविंद्र बुरुणकर हे मान्यवर उपस्थित होते.
إرسال تعليق