म्हसळयात पर्यावरण पूरक गणपती आरास स्पर्धेत उदय कळस यांचे सजावटीस प्रथम पहिला तर प्रमोद काते यांचे सजावटीस दुसरा क्रमांक



म्हसळा - रायगड
या वर्षीच्या गणेश गौरी उत्सावानिमित्त म्हसळा शहरातील गणेश गौरी सजावटी करिता नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पक्ष आणि म्हसळा नगरपंचायत यांच्या माध्यमातून पर्यावरण पूरक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान आणि म्हसळा नगरपंचायत यांच्या माध्यमातून स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.शहरातील गणेश भक्तांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केल्या.उदयकुमार कळस यांचे निवासस्थानी विराजमान गणेश आरास मध्ये जागृती समीर दिवेकर, समीर दिवेकर,वैभव कळस,सुशील दिवेकर,अनिकेत येलवे आणि मित्रमंडळ यांच्या माध्यमातून शिर्डीतील द्वारकामाई मंदिराचा हुबेहूब देखावा व निसर्गातील नैसर्गिक वस्तूंचा वापर करून १०० टक्के पर्यावरण पूरक द्वाराकमाई मंदिराचा देखावा सादर केला होता तर प्रमोद काते यांनी वृक्षांचे संवर्धन व महत्व या बाबत केलेल्या देखाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान कडून प्रथम क्रमांकाचे ७५००,५००० हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी,प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. त्याच प्रमाणे गौरी सजावट स्पर्धेत अमिता संजय कर्णिक यांच्या सजावटीस रोख रु.५०००/- सन्मानचिन्ह आणी प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.तृतीय क्रमांक दिलीप पानसरे तर गौरी सजावटीस दुसरा क्रमांक हरीश एडवी,तृतीय क्रमांक धर्मा धामणकर,उत्तेजनार्थ यशवंत पवार,मनोज म्हशीलकर,नितीन दिवेकर,ओंकार घोसाळकर या विजेत्यांना प्र.नगराध्यक्ष संजय दिवेकर,भावी नगराध्यक्ष संजय कर्णिक,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका y समीर बनकर,शहर महिला अध्यक्षा शगुप्ता जहांगीर,चंद्रकांत कापरे,भाई बोरकर,प्रदिप कदम,सरोज म्हशीलकर,नगरसेवक निकेश कोकचा, वृषाली घोसाळकर आदि मान्यवर उपस्थित होते.विजेत्यांचे खास.सुनील तटकरे, नाम.आदिती तटकरे,आम.अनिकेत तटकरे आणी राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा