संजय खांबेटे, म्हसळा
रायगडचे मूळ निवासी असलेले प्रसिध्द
शिवव्याख्याते सचिन कमळाकर करडे यांचे दिनांक गुरुवार दिं .५ व शुकवार दिं.६जानेवारी २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील उमाबाई बर्वे लायब्ररी, देवगड, स्नेहसंवर्धन मंडळ, देवगड आणि राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ, जामसंडे यांच्या संयुक्त विद्यमानेअनुक्रमे ५ व ६जानेवारी २०२३ रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यान मालेत "अष्टपैलू स्वातंत्र्यवीर सावरकर" आणि "भारतीय संस्कृती पुढील आव्हान" या विषयी व्याख्यान स्नेहसंवर्धन मंडळाचे सभागृह, उमाबाई बर्वे लायब्ररी शेजारी, देवगड येथे सायंकाळी ६.०० वाजता होणार आहे. त्याच प्रमाणे शनिवार दिं ७ जाने. २३ रोजी रत्नागिरी येथील प्रसिद्ध व्याख्यात्या डॉ. स्वराली राजन शिंदे यांचे आजची पिढी आणि संस्कार या विषयी व्याख्यान होणार आहे. सचिन करडे ह्यांचा शिवरायांची युद्धनीती, छत्रपती संभाजी महाराज, अष्टपैलू स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके या विषयीचा गाढा आभ्यास असून अद्याप पर्यंत त्यानी ३५० पेक्षा जास्त व्याख्याने देऊन समाज जागृती केली आहे.
إرسال تعليق