कुणबी समाजाबरोबर इतर समाजाला सोबत घेवून जाणारे नेतृत्व भास्कभाई नारायण कारे यांना जिल्हा परिषद निवडणूकिकरिता संधी मिळावी




वैभव घाडगे : तळा 

कुणबी समाजाबरोबर इतर समाजाला सोबत घेवून जाणारे नेतृत्व मा.भास्कभाई नारायण कारे यांना जिल्हा परिषद निवडणूकिकरिता संधी मिळावी अशी जनसामान्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.


 स्वराज्य प्रतिष्ठान रायगड संघटनेचे संस्थापक भास्करभाई नारायण कारे यांना कोकणातील प्रत्येक  जनसमुदाय ओळखत आहे.गेली दहा वर्ष हा माणुस पायाला भिंगरी लाऊन तळा , म्हसळा, , श्रीवर्धन , माणगाव , रोहा , मुरुड ह्या तालुक्यात काम करत आहे दहा वर्षांपासून हा माणुस सामाजिक हित जपत वेगवेगळ्या माध्यमातून  समाजकार्य , समाज उपयोगी काम करत आला आहे,आपला माणूस म्हणून अनेक सामान्य लोकाच्या ह्दयात ह्या माणसांनी आपली जागा बनवली आहे.हल्लीकडे पाह्याला गेलो तर आज रायगड जिल्ह्यातील बहुतांश श्रीवर्धन,तळा,म्हसळा, मुरूड, माणगांव भागातील गावातील मंडळी भास्करभाईंच्या भेटीगाठी घेत आहेत,यांतून नव्या अपेक्षांची चर्चा सर्वत्र सुरू आहे..अनेकांना भास्करभाईच्या नेतृत्वाची जाण आहे, प्रत्येक समाज घटकांनी त्यांचे कार्य पाहिले आहे,त्यांनी तालुक्यात विकासाच्या दृष्टीने उचलेली पाऊले प्रत्येक माणसाला माहिती आहेत, ह्याच अनुषंगाने आज सर्वत्र प्रत्येक समाजघटकांनी अर्थात सर्वसामान्य जनतेने नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर भास्करभाई कारे यांच्यासाठी आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी इच्छा दर्शवली आहे,सर्वसामान्यांच्या ह्या इच्छेचा लोकनेते खासदार सुनीलजी तटकरे साहेबांनी आदर करून सर्वसामान्यांचे नेतृत्व करणाऱ्या आपल्या माणसाला भास्करभाई नारायण कारे यांना संधी द्यावी अशी सर्वत्र तरी चर्चा सुरू आहे..समाजिक संघटनेच्या माध्यमातून भास्करभाईंनी अनेक गावांत विकासाची  क्रांती या अगोदरच सुरू केलेली असल्यामुळे सर्वसामान्यांचा विश्वास म्हणून भास्करभाई ठाम उभे आहेत, सर्वसामान्यांचा हा कणखर आत्मविश्वास भास्करभाईंच्या रूपाने साकार होणार अशी सगळीकडे सध्या तरी चर्चा आहे..ह्या आशेला निश्चितपणे पालवी फुटणार आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूकित सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारे समस्त बहूजन समाजाचे कैवारी रायगड जिल्ह्यातील तरुणांचे ताईत मा. श्री.भास्कर नारायण कारे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून संधी मिळेल आणि या संधीच सोन केलं जाईल असा ठाम विश्वास बाळगून आज सर्व सामान्य जनता पक्षांकडे लक्ष केंद्रित करून उभी आहे..

आदरणीय रायगड लोकसभा खासदार  सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ह्याजनसामान्यांच्या आवाजाला पाठबळ देऊन संधी द्यावी.

6 تعليقات

  1. नक्कीच संधी मिळावी

    ردحذف
  2. " निवडणुकीच्या रणांगणात घुमुदे त्यांचे वारे....
    निवडणुकीच्या रणांगणात घुमुदे त्यांचे वारे....
    त्या वादळाचे नाव असे भास्कर भाई कारे...
    त्या वादळाचे नाव असे भास्कर भाई कारे..."

    गोरगरीबांच्या न्याय हक्क साठी भास्कर भाई कारे नावच नेतृत्व खूपच गरजेचं आहे....

    आपल्या भूमिकेला चोखपणे पार पडणारे नेतृत्व.... रात्री अपरात्री संकटकाळी धावून येणारा आपल्या हक्काचा माणूस

    - तेजस ठाकुर

    ردحذف
  3. संधी नक्कीच भेटली पाहीजे गोरगरीबांचा कैवारी भास्कर भाई कारे यांना संधी भेटली पाहीजे

    ردحذف
  4. नक्कीच या अशा तडफदार नेतृत्वाला संधी मिळाली पहाणे

    ردحذف
  5. ज्या माणसानी गेली 10 वर्ष कुणबी सामाजाच नेतुत्व केल ज्या माणसानी गेली 10 वर्ष सामाजिक सघटणेच्या माध्येमातुन बहुजण समाजा साठी काम केल जो माणुस स्वताच दुख बाजुला ठेऊन दिवस रात्र काम करतोय आशा माणसाला नक्कीच सधी मिलाल पहिजे

    ردحذف
  6. सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी भास्कर भाईंची या जनतेला खूप गरज आहे रायगड जिल्ह्यातील युवा नेतृत्व असणारे भास्कर भाई कारे याना निवडणुकी करीता जनतेनी साथ दिली पाहिजे.

    ردحذف

إرسال تعليق

أحدث أقدم

नक्की वाचा