कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस म्हसळा वाचनालयात ’मराठीभाषादिन’ म्हणून साजरा.

(म्हसळा प्रतिनिधी)
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मायबोली मराठी भाषा दिन’ म्हणून सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते श्री सरस्वतीच्या मूर्तीचे पूजनआणि वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.यावेळी वाचनालयामार्फत पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले होते.यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे,संचालक प्रा.आर. एस.माशाळे,ग्रंथपाल उदय करडे, लिपिक दिपाली दातार उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा