Vaccination of adolescents | म्हसळा तालुक्यातील १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण आजपासून सुरु


संजय खांबेटे : म्हसळा

म्हसळा शहरांत न्यू इंग्लीश येथे आज पासून१५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरणा ला सुरुवात झाली आसल्याचे म्हसळा तालुक्याचे प्रभारी गटशिक्षण आधिकारी तथा ABDO राजेश कदम यानी सांगितले.आज ८२ किशोर वयीन मुलांचे लसीकरण झाले त्यामध्ये ५२ विद्यार्थिनी व ३० विद्यार्थांचा समावेश होता असे म्हसळा वैयकिय आधिकारी डॉ. प्रियांका दैशमुख यानी सांगितले.म्हसळा तालुक्यातील लसीकरण तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे माध्यमा तून होणार आहे ,तालुक्यात १५ ते १८ वयोगटा तील किशोरवयीन मुलांची संख्या २१४९ आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसळा अर्तगत ६ माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयआहेत त्यामध्ये किशोरवयीन मुलांची संख्या १४४१,प्राथमिक आरोग्य केंद्र मेंदडी अर्तगत ७ माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहेत त्यामध्ये किशोरवयीन मुलांची संख्या ४३९,प्राथमिक आरोग्य केंद्र खामगाव अर्तगत ८ माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहेत त्यामध्ये किशोरवयीन मुलांची संख्या २६९ आहे.यासाठी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य  विभागाची यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज झाली आहे.कोव्हॅक्सीन लस तालुक्यात पुरेशी आहे.प्रत्येक विद्यालयाचे प्राचार्य  आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे  वैयकिय आधिकारी यांचा योग्य समन्वय आहे. सर्व लसीकरण शाळा - महाविद्यालयांत होणार आहे.२००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व किशोर वयीन मुले या लसीकरणासाठी पात्र आहेत. असेही कदम यानी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा