नगरपंचायतीतील १२ प्रभागातील ४९७८ मतदारांपैकी ३४१० मतदारानी बजावला मतदानाचा हक्क ; ३८ उमेदवारांचे नशीब EVM मध्ये बंद

म्हसळा नगरपंचायतीतील १२ प्रभागातील 
४९७८ मतदारांपैकी  ३४१० मतदारानी बजावला मतदानाचा हक्क .
३८ उमेदवारांचे नशीबEVM मध्ये बंद.
मतमोजणी होणार १९ जाने २०२२ रोजी.
( म्हसळा दि .२१ डिसें २१)
म्हसळा नगरपंचायतीतील १२ प्रभागातील ४९७८ मतदारांपैकी  ३४१० मतदारानी   मतदानाचा हक्क बजावला .यामध्ये १७६५
स्त्री मतदार ,१६४५ पुरुष मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्वात कमी मतदान प्रभाग क्रं.५ (सर्वसाधारण माहिला) यामध्ये केवळ ५९.१ म्हणजे  ५०९ मतदारांपैकी  ३०१ मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर सर्वात जास्त मतदान प्रभाग क्रं.१७ (सर्वसाधारण) यामध्ये ४८३ पैकी ३९२ मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला.३८ उमेदवारांचे नशीबEVM मध्ये बंद रहाणार त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस १२, भाजपा ८, काँग्रेस ८, शिवसेना ५, शेकाप ३, अपक्ष २ असे उमेदवार आहेत. निवडणुकीत प्रभाग क्रं.२,७,८,९ या चार ठीकाणची उमेदवारी ना.मा.प्र.असल्याने निवडणुक स्थगित झाली, व प्रभाग क्रं.४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती सरोज मंगेश म्हशीलकर या बिन विरोध निवडून आल्यामुळे आज केवळ १२ प्रभागातून मतदान प्रकीया झाली.याची मतमोजणी होणार बुधवार १९ जाने २०२२ रोजी. नगरपंचायतीतील प्रभाग क्रं.२,७,८,९ या चार ठीकाणची उमेदवारी ना.मा.प्र.आहे ती मा. सर्वोच्च न्यायालयाचे दिं.१५.१२.२१ च्या निर्णयामुळे सर्वसाधारण होतील, त्यांचे सुधारीत माहिला आरक्षणाची सोडत गुरुवार दि.२३.१२.२१ रोजी मा. मुख्याधिकारी यांच्या कार्यवाहीखाली सार्वजनिक वाचनालय म्हसळे येथे होईल.व मतदान मंगळवार दिं १८ जाने २०२२ रोजी होणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा