गोवंश चोरीची घटना अखेर म्हसळा पोलीसानी नोंदविली : गुन्हा घडल्यापासून गुन्हा नोंदविण्यास अवधी का जातो याची चौकशी होणे गरजेचे
संजय खांबेटे : म्हसळा
गोवंशाची तस्करी करणारी टोळी दक्षीण रायगडसह
म्हसळे तालुक्यांत सक्रीय असावी अशी शेतकरी वर्गात चर्चा सुरु असतानाच म्हसळा शहरा नजीकच्या सावर गावा तील एका शेतकऱ्याचा बैल चोरीच्या घटनेने पुढे आला. चरायला सोडलेला बैल रात्री ठरल्या वेळी घरी न आल्याने सावर येथील सदा काते या भांबावलेल्या शेतकऱ्याने पोलीसांकडे धाव घेतली हकीगत ऐकली पण पोलीसानी चोरीची नोंद न केल्याने अखेर शेतकऱ्यानी शहर व तालुका हिंदू समाजाचे अध्यक्षांकडे आपले गाऱ्हाणे मांडले त्यात शेतकऱ्याने पोलीसाना घटनाक्रम सांगूनही पोलीसानी नोंद केली नाही असे सांगताच हिंदू समाजाचे अध्यक्ष महादेव पाटील, शहर हिंदू समाजाचे अध्यक्ष सुभाष उर्फ बाळशेट करडे, बजरंग दलाचे बाबू बनकर व अन्य पदाधिकारी व शेतकरी यानी प्रभारी आधीकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बैलचोरीच्या घटनेची प्रथम नोंद करावी असा अग्रह धरला. घटना व साक्षीदार यांची पडताळणी व गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून या गुन्ह्यामागे गोवंशाची तस्करी करणारी टोळी असणार याकारणाने अखेर पोलीसानी गुन्हा नोंदविला. सावर(म्हसळा) येथील शेतकरी सदानंद गोविंद काते वय ४८ यानी दिलेल्या फिर्यादी वरून गु.र.नं.७८भा.दं.सं ३७९, ५११,३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली. गुन्हा नोंदविल्यापासून केवळ ८ ते १० तासात आरोपीला अटक केले असल्याचे तपासी अमलदार हे कॉ.चव्हाण यानी सांगितले. फिर्यादी अगर तक्रारदाराने गुन्द याबाबत सर्वकष माहीती देऊनही म्हसळा पोलीस अनेक वेळा गुन्हा रितसर नोंदविण्यास विलंब करतात याची वरीष्ठानी चौकशी करणे आवश्यक आहे असे पाटील यानी यावेळी सांगितले.
"म्हसळा शहरानजीकच्या दुर्गवाडी, चिराठी,सुरई, घोणसे, खारगांव (बु) ,तोंडसुरे,खरसई, मेंदडी या भागासह तालुक्या तील ग्रामिण भागातील अनेक गावांतून अनेक गोवंशीय गुरांची तस्करी झाली आहे. त्या सर्वानी प्रथमतः गुरे चोरी होणार नाही याबाबत विशेष सर्लकता बाळगावी , गुरे चोरी झाल्यास म्हसळा पोलिसांत आवश्य तक्रार द्यावी"- महादेव पाटील , म्हसळा तालुका हिंदू समाज अध्यक्ष
إرسال تعليق