म्हसळयात भरवस्तीत पाच बंद घरे चोरटयानी फोडली


म्हसळयात भरवस्तीत पाच बंद घरे चोरटयानी फोडली : फार मोठया प्रमाणावर ऐवज लंपास झाला असावा अशी चर्चा.: २० तास उलटले तरी गुन्ह्याची नोंद नाही.

संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शहरातील कन्या शाळा (२), तांबट आळी (२)व साने आळी (१)परीसरांत अशी तब्बल पाच बंद घरे फोडण्याच्या घटना  घडल्याचा प्रकारआज म्हसळ्यात  घडला.त्यामध्ये कन्याशाळा परिसरांतील १) सुनील द्वारका नाथ उमरटकर२)रमेश गजानन पोतदार तांबटआळी परिसर १) मंगेश गोपीनाथ हेगीस्टे २) विनायक शांताराम पोतदार , साने आळी १)जमाल अजीम तळकर. अशी पाच बंद घरे आसल्याने नक्की किती ऐवजावर चोरटयानी डल्ला मारला ही माहीती अद्यापही पोलीसानी प्रसीध्दी माध्यमाना दिली नाही. तळकर यांच्या घरांतून चोरटयानी रोख रक्कमेवर डल्ला मारल्याचे श्रीमती तळकर यानी सांगितले. घरफोडी झालेली बहतांश घरे भर वस्तीत आहेत. पाचही घरमालक हे सुसंस्कृत व मध्यम वर्गीय बँक लॉकर व गुतवणूक याबाबत परिपूर्ण माहीतीवाले  आसल्याने चोरट्यांच्या हाती नक्की काय लागले असावे याबाबत केवळ चर्चा सुरू आहे.चोरट्यानी लक्ष केलेल्या भागातच प्रभारी पोलीस अधिकारी व किमान चार पोलीस कर्मचारी वास्त्यव्यास रहातात.

"बहुतांश घरांतून चोरट्यानी एकाच पध्दतीने गुन्हा केला आहे.कुलुप किंवा कडी कटरने तोडून घरात प्रवेश केला, छोटया मोठया हत्याराने घरांतील कपाट उघडून आतील रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तूचा पोबारा केला आसावा"

" आम्ही गेले अनेक वर्ष म्हसळा पोलीसांचा Night Round बघत आलो असून गेले काही महीने म्हसळा पोलीस रात्रीच्या वेळी "सायरन " वाजवित गस्त का घालतात हा गहन विषय आहे"
भालचंद्र पंढरीनाथ करडे, अध्यक्ष,त्वष्टा कासार समाज म्हसळे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा