म्हसळा नगरपंचायतीच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या ४ जागा अनारक्षित ; १८जानेवारीला मतदान.


म्हसळा नगरपंचायतीच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या ४ जागा अनारक्षित: प्रभाग क्रं ७ आणि ८ महीला सर्वसाधारण .
मंगळवार दि.१८जानेवारीला मतदान.

प्रतिनिधी म्हसळा
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करण्यात आल्या त्यामुळे म्हसळा नगरपंचायती मधील ४ प्रभागांतील नागरिकां चा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून आज नव्याने २ प्रभाग महीलांसाठी आरक्षीत करण्यात आले. त्यामुळे आता प्रभाग क्रं.७ व८ आता महिलां साठी राखीव तर आता प्रभाग क्रं २ आणि ९ सर्वसाधारण रहाणार आहेत. या चार प्रभागांतून १५११ एकूण मतदार असून त्यामध्ये स्त्री मतदार ७४७ तर पुरुष मतदार ७६४ आहेत. दि.१८ जानेवारी २०२२ला मतदान होणार असून मतमोजणी  १९ जानेवारी २० २२ रोजी होईल असे सांगण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा