संजय खांबेटे : म्हसळा
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून संगणकीकृत ७/१२ मोफत घरपोच करण्याच्या कार्यक्रमाचा आज म्हसळा तालुक्यातील पाभरे येथे शुभारंभ करण्यात आला.यावेळी पालकमंत्री आदीती तटकरे यानी पंचक्रोशीतील बागायतदार,शेतकऱ्याना सातबारा वाटप केले,यावेळी महसूल विभागातील सर्व आधिकाऱ्यांसह कोतवाल,तलाठी,मंडळआधिकारी यांच्या माध्यमातून पारदर्शक व लोकाभिमुख काम होत आहे याचे कौतुक आहे असेही सांगितले.महसूल व शेतकरी यांचे जिव्हाळ्याचे नाते वाढत आहे.महासून विभागाच्या इ पिक पाहणी, ई महाभूमी ,ई फेरफार अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत. तसेच ७/१२ वाटप करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले असून म्हसळा तालुक्यामध्ये ४६१३८ ७/१२ व २८९२४ खातेदारांना मोफत ७/१२ वाटप करण्यात येईल असे सांगितले.
महसूल विभागातील तलाठी मंडळ अधिकारी हे प्रत्येक गावात जाऊन ७/१२ वाटप करणार आहेत असे पालकमंत्री आदितीताई यांनी सांगितले. यावेळी म्हसळा तालुक्यातील सर्व तलाठी सजा कार्यालये यांना ज्या व्यक्तींनी आपली जागा बक्षीसपत्राने महसुल प्रशासनाला दिली त्यांचा देखील सन्मान पालक मंत्री यानी केला. यावेळी श्रीवर्धन उप विभागाचे उप- विभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थिताना दिली.या कार्यक्रमा ला रायगड जिल्ह्याचे कृषी सभापती बबन मनवे ,म्हसळा तहसीलदार समीर घारे तसेच म्हसळा तालुक्याच्या सभापती श्रीम छाया म्हात्रे ,उप- सभापती संदीप चाचले,पं.स. सदस्या उज्वला सावंत ,मधु गायकर पाभरे ग्रा. सरपंच अनिल बसवत उप सरपंच मजहर काझी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.तसेच ७/१२ वाटप कार्यक्रमाला पाभारे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास म्हसळा मंडळातील मंडळ अधिकारी दत्ता कर्चे,तलाठी पाभरे गोरख माने, तलाठी म्हसळा कैलास पाटील तलाठी देवघर भगत, तलाठी केलटे गजानन गिर्हे व तलाठी वरवटणे श्रीम.पूनम कारंडे. व सर्व कोतवाल उपस्थित होते.
إرسال تعليق