म्हसळा तहसीलदारपदी समीर घारे यांची नियुक्ती.



संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळ्याचे तहसीलदार शरद गोसावी हे ३१ऑगस्ट२०२१ रोजी नियत वयोमाना नुसार सेवानिवृत्त झाल्याने रिक्तअसले-ल्या पदावर खेड(रत्नागिरी)येथील अप्पर तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण या पदावर कार्यरत असलेले समीर घारे यांची नियुक्ती झालीआहे.घारे यांना जिल्हाधिकारी कार्यालय रायगड,सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील मालवण,कणकवली,रत्नागिरी जिल्ह्या तील दापोली,खेड या तालुक्यांतून सेवेचा त्याना प्रदीर्घ अनुभव आहे.घारे यांची बहुतांश सेवा कोकणात झाल्याने कोकणावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व अन्य संकटांचा त्यांचा आभ्यास आहे. गौण खनिजांचे उत्खनन ,बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या लोकांविरुध्द,स्वस्त धान्य दुकाने व वाटप यंत्रणेतील काळा बाजार रोखणे याकामी ते नेहमी शासना चे बाजूने कठोर भूमिका घेतात.त्यांच्या अनुभवाचा व आभ्यासाचा म्हसळाकरा ना निश्चित लाभ होणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा