माणगाव - भारतीय डाग विभाग रायगड जिल्हा पोष्ट विभागाचे अधिक्षक अविनाशजी पाखरे साहेब , उपविभाग डाक निरीक्षक प्रभारी अधिकारी सचिनजी शेंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुकन्या समृद्धी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच डाक आवेक्षक श्री संजय पालकर, श्री किशोर नाडकर यांचे ही सहकार्य लाभले अशावेळी समाजसेवक मा श्री. दिलीप चंद्रकांत लहाने , मा श्री संतोष रघुनाथ खडतर मा श्री. चंद्रकांत बाबू लहाने यांच्या बहुमोल सहकार्याने एकुण ५० सुकन्या समृद्धी योजनेची पासबुक पाॅन्सर केली. उपस्थित डोनेटर यांच्या हस्ते पासबुक वितरण करण्यात आले. अथक परिश्रम ब्रांच पोष्ट मास्तर खरवली - माणगाव जयवंत नाक्ती यांनी घेऊन गाव स्तरावर योजनेची माहिती देऊन १००% यशस्वी सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ लहान मुलींना मिळवून दिला. डाक विभागाने सुंदर उपक्रम हाती घेऊन लोकांना आदर्श मिळवून दिला. सर्वच स्तरातून डाक विभागानचे कौतुक होत आहे. सढल हाताने सहकार्य करणारे समाज बांधव यांचे ही समाजात उल्लेखनीय कार्याची ओळख होत. आहे
सुकन्या समृद्धी योजनेचा माणगाव मध्ये १००% लाभ
Admin Team
0
إرسال تعليق