म्हसळा-प्रतिनिधी
श्रीवर्धन आगारातर्फे म्हसळा-पाभरे -तळा-नालासोपारा अशी एसटी बस सेवा सुरू केली आहे.सदरची बस सकाळी ११.३०वाजता श्रीवर्धन येथून सोडण्यात येणार असून रात्री ८वा. नालासोपारा येथून सोडण्यात येणार असल्याचे परिवहन विभागातर्फे सांगण्यात आले.या बस सेवेत म्हसळा,सुरई,खारगाव, पाभरे, निगडी, कांदळवाडा,मजगाव,वाशी,मांदाड,तळा येथील प्रवाशांना प्रवास करणे सोईचे होणार आहे. ही बससेवा कायम स्वरुपी सुरु रहाणार असून प्रवाशांना बसची संगणकीय आरक्षण सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर बससेवेचा शुभारंभ या पंचक्रोशीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सामाजिक कार्यकर्ते व पाभरे ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल बसवत यांच्या हस्ते झाला.पाभरे मार्गे नालासोपारा बस सेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन बसवत यांनी यावेळी केले.उद्घाटन कार्यकमाला खारगाव सरपंच अनंत नाक्ती,पांडुरंग सुतार,देवघर ग्रामपंचायत सदस्य उदय महामुणकर उपस्थित होते. पाभरे तळा मार्गावर बऱ्याच वर्षानंतर मुंबई उपनगराकडे जाण्यासाठी एसटी बस सेवा सुरू करण्यात आल्याने खारगाव बुद्रुकचे सरपंच अनंत नाक्ती व उपस्थितानी एसटी प्रशासनाला धन्यवाद दिले.
إرسال تعليق