श्रीवर्धन - श्रीवर्धन उपजिल्हारुग्णालय रुग्णालयात बायो मेडिकल प्लँट आदी अद्यावत सुविधांच्या उदघाटन पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ना. आदिती तटकरे यांनी गेल्या दोन वर्षात प्रशासनाने आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी जास्त प्रयत्न केले आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या भीतीच्या काळात भीती बाजूला ठेवून जास्तीत जास्त सुविधा पुसरवण्यासाठी सर्व आरोग्य सेविकांना खूप मेहनत घेतली त्याबद्दल सर्व आरोग्य कर्मचारी याना धन्यवाद केले. त्याकाळात ऑक्सिजन बेडची सुविधा वाढवली जाते. त्यात नैसर्गिक आपतींना निसर्ग चक्रीवादळ तोक्ते वादळ आश्या अपत्यांना सामोरे जावे लागले. यावेळी लाईट जायची त्यामुळे रुग्णालयाला अडचन निर्माण व्हायची. मग जनरेटर भाड्याने आणावा लागायचा म्हणून सर्वप्रथम रुग्णालयात स्वतंत्र जनरेटर दिला. रुग्णांना कोणतीही बाधा होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतो. सी एच आर आई च्या माध्यमातून ड्युरा सिलेंडर उपलब्ध करून दिले. त्याच ४५ ते ५० लाख खर्च आहे. रुग्णालयातील कचरा पावडर फार्म मध्ये रूपांतर होईल योग्य पद्धतीने हाताळणाऱ्या माणसांची देखील काळजी घेतली जाते. यावेळी बोलताना ना. आदिती तटकरे यांनी महाड, रोहा, म्हसळा दुसऱ्या तालुक्यातून रुग्ण उपचारासाठी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात येतात आणि बरे होऊन जातात. याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगत श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेतील अधिकारी यांची पाठ थोपटली. यावेळी नगराध्यक्ष फैसल हुर्जुक, तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, मंगेश कोमनाक, डॉ. मधुकर ढवळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
إرسال تعليق