फोटो : उपास्थित शेतकऱ्याना मार्गदर्शन करताना खासदार सुनिल तटकरे.
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा श्रीवर्धन तालुक्यातील शेतकरी- बागायतदार व कृषी संबधीत सर्वाना शासनाच्या योजना त्यांच्या गावां-गावांत
पोहचविणे आणि शेत मालाला योग्य भाव येण्यासाठी त्यांच्या गावांतून बांधा वरून माल खरेदी करण्याचे आमच्या शासनाचे धोरण आहे,खरीप हंगाम संपताच तालुक्यात भात खरेदी विक्री केंद्र कार्यान्वित करणार आसल्याचे खासदार तटकरे यानी न्यू इंग्लिश स्कूल म्हसळाचे सभागृहात संपन्न भव्य मेळाव्याचे उदघाटन समारंभात सांगित ले मेळाव्याला रायगडचे कृषी सभापती बबन मनवे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अलिशेट कौचाली,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर,पं.स. म्हसळाच्या सभापती छाया म्हात्रे, उप सभापती संदीप चाचले,सदस्य मधुकर गायकर,माजी सभापती उज्वला सावंत, माजी सभापती महादेव पाटील,नाझिम हसवारे,अंकुश खडस,दिवेआगरचे सरपंच उदय बापट,म्हसळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रियाज घराडे,युवक अध्यक्ष फैसल गीते,जिल्हा उपाध्यक्ष मुसद्दीक ईनामदार, निगडीचे सरपंच महादेव पाटील,महिला अध्यक्षा रेशमा कानसे,शहर अध्यक्षा शगुप्ता जहांगिर,नगराध्यक्षा जयश्री कापरे व हजारो शेतकरी मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी मार्गदर्शन करताना शेती आणि शेती पुरक व्यवसाय शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्याचा फायदा शेतकर्यां नी करून घेतला पाहिजे त्यासाठी लागणारी मदत शासनाच्या वतीने करण्यात येते त्याचा लाभ शेतकरी फळबागायतदार यानी घ्यावा या साठी आजच्या कृषि मेळाव्याचा हट्टाहास असल्याचे खासदार यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी उज्वला बाणखेले यानी कृषी विभागाच्या योजना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बंकट आरले पशुसंवर्धन योजना, मत्स्य व्यवसाय कृषि विज्ञान केंद्र किल्ला,रोहा येथील डॉ.माधव गीते ,मधुमक्षिका पालन करणेसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नित्यानंद पाटील,आळंबी उत्पादनाची माहिती उत्पादक शेतकरी राजेंद्र मोहिते ह्या विविध आधिकाऱ्यानी शेतकऱ्याना विविध योजनांची माहीती दिली. सुधागड पाली येथील प्रगतशील शेतकरी कुमारी रसिका पाठक ह्यानी त्यांचे अनुभव कथन केले. मेळाव्याचे आयोजक कृषी व पशुसंवर्धन विभागा चे सभापती बबन मनवे यांचे शेतकऱ्या नी कौतुक केले.
फोटो :शेतकरी मेळाव्याला अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार करताना रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बबन मनवे

إرسال تعليق