नारीशक्ती सोमजाई मंगळागौर गृप श्रीवर्धन आयोजित ऑनलाईन उखाणे स्पर्धा उत्साहात संपन्न, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रथम क्रमांक सौ. ज्योती प्रितम जाधव, द्वितीय क्रमांक सौ. शितल श्रीराम तोडणकर, तृतीय क्रमांक सौ. रिद्धी रविंद्र करंजकर
स्वरा पुलेकर : श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यातील गृहिणीनी एकत्र येऊन तयार केलेला नारीशक्ती सोमजाई मंगळागौर गृप...वारसा संस्कृतीचा ध्यास जनजागृतीचा या बोधवाक्याप्रमाणे निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांन
मदत, वृक्षारोपण, मंगळागौरीचे छान छान नृत्य अशा विविध उपक्रमांनी आपली आवड, छंद, सामाजिक बांधिलकी जोपासणारा हा गृप...
महिलांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वटपौर्णिमेचे औचित्य साधून या गृपने नुकतीच पर्यावरण जोपासना, कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती या विषयावर ऑनलाईन उखाणे स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धेत श्रीवर्धन तालुक्यातून महिलांनी भरभरून सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. ज्योती प्रितम जाधव, द्वितीय क्रमांक सौ. शितल श्रीराम तोडणकर, तृतीय क्रमांक सौ. रिद्धी रविंद्र करंजकर यांनी पटकावला. गृप च्यावतीने तुळशीचे रोप, सन्मान पत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले.
إرسال تعليق