Shivrajyabhishek 2021 : रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात




टीम म्हसळा लाईव्ह 

संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत म्हणून ओळख असलेल्या आणि आपल्या तलवारीच्या जोरावर दिल्लीतील मुघल सत्तेला आव्हान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४८ व्या राज्याभिषेक सोहळ्याला आज किल्ले रायगडावर सुरुवात झाली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा हा साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून स्थानिक प्रशासनाने या सोहळ्याला परवानगी दिली आहे. या दिवसाचं खासं वैशिष्ट्य म्हणजे सुमारे ३५० वर्षांपेक्षा अधिक काळानंतर शिवराज्याभिषेक दिनानिमीत्त शिवरायांवर सुवर्ण होनांनी खास अभिषेक होणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांचीही या सोहळ्याला विशेष उपस्थिती असणार आहे.

यंदा कोरोनाची परिस्थिती पाहता मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला जाणार असून प्रशासनाने सर्व शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करताना शिवराज्याभिषेक दिन घरातूनच साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. आज सुवर्ण होनांनी शिवरायांवर होणारा अभिषेक हा आपल्यासाठी आणि राज्यासाठी एक सुवर्णक्षण असल्याचं प्रतिक्रीया खासदार संभाजीराजे यांनी दिली आहे.


Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा