
पन्हळघर बुद्रुक ( राम भोस्तेकर )मुंबई गोवा हायवेचे काम संथ गतीने सुरु असून अपघात मालिका सुरु असून अनेक जण या अपघातामध्ये बळी जात आहेत. या हायवेचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे माणगांव भाजप अध्यक्ष संजय (आप्पा)ढवळे हे लवकरच जनहित याचिका दाखल करणार आहेत असे त्यांनी सांगितले.
मागील दहा वर्षांपासून मुंबई गोवा हायवेचे काम सुरु असून सदर रस्त्याचे काम अत्यंत सुमार, निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. या महामार्गचे काम ज्या ठेकेदारांनी घेतले आहे ते ठेकेदार मनमानी करत असून जनतेच्या जीवाशी खेळ करीत आहे.निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अनेक कुटुंबातील प्रमुख व्यक्तींना अपघातात जीव गमवावा लागला आहे, त्यामुळे काही कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून या सर्व बाबीना सदर रस्त्याचे ठेकेदार जबाबदार आहेत असे संजय ढवळे यांनी सांगितले.
या महामार्गत ज्या शेतकऱ्यांचा जागा गेल्या आहेत त्यातील काही शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नसून त्यांची जागा संपादित करून काम सुरु केले आहे तरी सुद्धा काही शेतकरी मोबदल्या पासून वंचित आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला माती भराव केला असून या माती मध्ये अनेक वेळा गाड्या खचल्या जातात. या महामार्गांवर या ठेकेदारांचा कामाबाबत आनागोंदी कार्यक्रम सुरु असून या कामाबाबत दिरंगाई होत आहे तसेच निकृष्ट काम होत असल्यामुळे माणगाव भाजप अध्यक्ष संजय ढवळे हे संतप्त झाले असून ठेकेदार यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करणार आहेत.
إرسال تعليق