आज दि २१ जून २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त, भारतीय जनता पार्टी म्हसळा तालुका यांच्या वतीने योग प्रशिक्षण मौजे रेवळी येथे संपन्न झाले. यावेळी प्रशिक्षक श्री. उत्तम मांदारे यांनी विविध योगाचे प्रकार उत्तम रित्या करून घेतले तसेच योगा केल्याने आपल्याला होणारे फायदे यावर थोडक्यात माहिती दिली. आज या योगा दिनानिमित्त सहभागी झालेल्या सर्व पदाधिकारी यांनी नियमित योगा करणार अशी शपथ घेतली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष श्री. प्रकाश रायकर, तालुका सरचिटणीस श्री. महेश पाटील, तालुका सरचिटणीस श्री. सुनिल शिंदे, तालुका उपाध्यक्ष श्री. अनिल टिंगरे, तालुका उपाध्यक्ष श्री. लहू तुरे, श्री. रमेश पोटले, श्री. राजेंद्र चव्हाण, श्री. शरद कांबळे, श्री. सुबोध पाटील, श्री. दिनेश काप, श्री. जितेंद्र नाक्ती, आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भाजपा म्हसळा तालुका यांच्या वतीने योग प्रशिक्षण शिबिर संपन्न
Admin Team
0
إرسال تعليق