मंदीरातील दानपेटीवर चोरट्यानी मारला डल्ला : म्हसळा पोलीसांनी१२तासात आवळल्या चोरट्याच्या मुसक्या.



संजय खांबेटे : म्हसळा 
 म्हसळा तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मेंदडी येथील गणेश मंदिरात दान पेटीवर चोरट्यानी डल्ला मारल्याच्या घटनेची नोंद म्हसळा पोलीसांत करण्यात आल्याची माहीती ठाणे अमलदार मनिषा पाटील यानी दिली. या बाबतची फिर्याद महेंद्र एकनाथ गाणेकर वय २३रा. मेंदडी कोंड याने दिल्याने म्हसळा पोलीसानीगु.र.नं. ५४/२०२१ भा.द.वि.३८०,४५७ प्रमाणे नोंद केली आहे. मंदीराचा मागील दरवाजा तोडून चोरट्यानी मंदीरात प्रवेश करून दानपेटी फोडल्याची घटना घडली असे फिर्यादीने सांगितले.तपासी अमलदार रामदास सुर्यवंशी ( ब.नं.९७३) यानी घटना क्रमाचा आभ्यास करून काही तासातच चोरट्याला जेरबंद केल्याचे सांगण्यात आले. आरोपी अरुण चंद्रकांत बुधे वय ३५ रा. मेंदडी कोंड याला पोलीसानी अटक केली आहे. 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा