रत्नागिरीला काम बघायला गेलेला सितारामराठोड अद्याप परत आला नाही : पोलीसांत तक्रार


संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शहरात दिघी रोड परिसरांत रहाणारे सिताराम अंबू राठोड वय ५३ हे दिं. २८ मे पासून बेपत्ता आसल्याची तक्रार मुलगा विष्णू सिताराम राठोड, वय २३ याने म्हसळा पोलीसांत दिल्याने. म्हसळा पोलीसानी मनुष्य मिसींग रजी. नं.४/२१ने  नोंद केली आहे. सिताराम हा गेले ५-६ वर्ष म्हसळा येथे आपल्या कुटुंबियासमवेत रहात असून बांधकाम व्यवसायाशी निगडीत छोटी मोठी कामे करीत असतानाच घरांतून व मुलाला फोन लाऊन मी रत्नागिरीला काम बघून येतो असे सांगून २८ मे रोजी घरांतून निघून गेला तो अद्याप आलाच नसल्याचे मुलानी पोलीसांत नोंद दिली. 

बेपत्ता सितारामचे वर्णन पुढील प्रमाणे 
रंग सावळा, उंची ५ फुट ६ इंच ,चेहरा गोल,केस काळे, उजव्या हाताचे तर्जनीत सोन्याची अंगठी,अंगात काळ्या रंगाची फुलपँट व सफेद शर्ट परिधान केलेले अशा वर्णनाचा इसम आढळल्यास कृपया म्हसळा पोलीस स्टेशन दूरध्वनी क्रं ०२१४९- २३२२४० या क्रमांकावर संपर्क साधावा. असे म्हसळा पोलीसानी कळविले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा