निकृष्ठ दर्जाचा भापट रस्त्यावरून शिवसेना आक्रमक...अभियंत्याला फासले काळे
बाबू शिर्के म्हसळा
तालुक्यातील विविध भागांतील रस्त्याच्या कामाला वेग आला आहे. मात्र, या रस्त्यांचे काम निकृष्ट होत असून कामाचा दर्जा अत्यंत खालावलेला असल्याचा आरोप शिवसेनेच्या स्थानिक प्रतिनिधींनी केला आहे. पहिल्या पावसात या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.
या विरोधात म्हसळा येथील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आंदोलन केले आले. शिवसेना माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या म्हसळा शाखा अभियंत्यांच्या तोंडाला काळी शाही फासली आहे.
या संदर्भात बैठकीला संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून बैठक लावा अशी मागणी संबंधीत शिवसेना नेत्याने केली होती. मात्र, अधिकाऱ्याला अभियंत्याने बोलावले नाही. असा आरोप शिवसेनेने केला आहे. भापट हा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर हा रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, शाखा अभियंता व ठेकेदार यांच्या चुकीच्या कामाच्या पद्धतीने निकृष्ट व तकलादू रस्ता तयार झाला. पहिल्या पावसात या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
_सबस्क्राईब करा *Mhasla Live* च्या आपल्या YouTube चॅनलला. सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇🏻_
https://www.youtube.com/channel/UCTHfT0VcgwVi2nlMmRx7I1g
💁🏻♂ *आजच चॅनल सबस्क्राईब करा आणि 🔔 विसरू नका..*
إرسال تعليق