श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन ग्रामीण भागातही मनसेची संघटना बांधणी. यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्ष वाढीसाठी , तसेच संघटना बांधणीवर जोर देण्यात येत आहे . दरम्यान श्रीवर्धन तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नागलोली ( सातगाव पंचक्रोशी ) गावचे शाखाध्यक्षपदी रोशन दिनेश महाडिक ( नागलोली नवीवाडी ) आणि उपशाखाध्यक्षपदी सतिश सुरेश खळे ( नागलोली मधली वाडी ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे . श्रीवर्धन महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष सुशांत पाटील आणि तालुका सचिव सुमित सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली आहे . दरम्यान खेड्यामधील विकास कामांवर कसा भर दिला जाईल गावातील समस्या सोडविण्यासाठी नेहमीच मनसे कार्यकर्ते तत्पर असतील असे नवनिर्वाचित शाखाध्यक्ष रोशन महाडिक यांनी या दरम्यान बोलताना सांगितले .
إرسال تعليق