म्हसळ्यात सेना विरुद्ध राष्ट्रवादीत राजकारण तापले


म्हसळ्यात सेना, राष्ट्रवादीत राजकारण तापले : राजकारणात शून्य असणाऱ्या माणसाला विकासकामे कशी समजणार:समीर बनकर यांचा नंदू शिर्के यांना टोला 
बाबू शिर्के : म्हसळा
म्हसळा तालुक्यासाहित संपूर्ण जिल्ह्याचा विकास पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने होत असून,राजकारणात शून्य असणाऱ्यांना तालुक्यात  होत असलेले विकासकामे कशी समजणार असे वक्तव्य करीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष समीर बनकर यांनी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांच्यावर टीकेची झोड उचलली आहे.
पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या सततच्या दौऱ्यामुळे आरोग्य विभागावर ताण पडतो.पालकमंत्री कोणत्याही कार्यक्रमामध्ये शिवसेनेला सामील करून घेत नाहीत अशी वक्तव्य करून शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी अदिती तटकरे यांच्यावर टीका केली होती.या टीकेला उत्तर देताना बनकर यांनी नंदू शिर्के  यांच्यावर टीका केली आहे.
कोरोना काळात आरोग्य यंत्रणेची स्थिती बळकट करणे गरजेचे आहे.याच हेतूने पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने म्हसळा ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांचे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर सुरु झाले आहे.ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र खामगाव येथे प्रत्येकी एक-एक सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.चक्री वादळ,कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार खासदार व कार्यकर्ते जमीन पातळीवर काम करीत आहेत.या लाटेमध्ये आपण घरी बसून काय केले असा सवाल समीर बनकर यांनी शिर्के यांना विचारला आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे,या सरकारमध्ये अदिती तटकरे या मंत्री आहेत,सुनील तटकरे हे जिल्ह्याचे खासदार आहेत.त्यांना इतर तालुक्यातील शिवसेनेची मंडळी विकास कामांसाठी भेटायला जाते.असे असताना आपण कितीवेळा त्यांना विकास कामांसंधर्भात भेटायला आलात.तुम्ही तुमच्या नेत्यांकडून तालुक्यात कोणती विकास कामे आणलीत याचे उत्तर शिर्के यांनी द्याचे असे वक्तव्य  समीरबनकर यांनी पत्रकारासोबत बोलताना उपस्थित केला आहे. नंदू शिर्के हे समाजकारण व राजकारणात शून्य आहेत,पालकमंत्र्यांवर टीका करताना त्यांनी पहिले राजकारण शिकावे असा टोला बनकर यांनी यावेळी लगावला.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा