टीम म्हसळा लाईव्ह
अलिबाग आगारातील बसचालक व वाहक यांनी बसमधील प्रवाशाची विसरलेली बॅग व त्याचे पैसे प्रामाणिकपणे परत करून एक आदर्श निर्माण केला आहे.
दि.15 जून 2021 रोजी सकाळी 08:15 वाजता रेवदंडा व 09:15 वाजता अलिबागहून जाणाऱ्या रेवदंडा-बोरिवली गाडी क्र.3234 मधील एक प्रवासी त्याची बॅग विसरला होता. बसचालक निलेश पाटील व वाहक जितेंद्र पवार यांनी या प्रवाशाची विसरलेली बॅग व बॅगमधील रोख रु. 35 हजार, ओळख पटवून त्यास परत केली.
त्यांच्या या प्रामाणिक कृत्यामुळे अलिबाग आगाराची व एस.टी महामंडळाची प्रतिमा जनमानसात उज्ज्वल केल्याबद्दल या दोन्ही प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा आगार व्यवस्थापक श्री.अजय वनारसे यांच्या हस्ते आज अलिबाग आगारात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
إرسال تعليق