टीम म्हसळा लाईव्ह
तालुक्यातील मोठया आणि प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या खरसई ग्रामपंचायत सरपंच पदी निवडून आल्यानंतर श्री निलेश मांदाडकर अनेक लोकउपयोगी कामे केली. तसेच कोविड काळातही योग्य त्या उपाययोजना करून गावासह तालुक्यात कोरोना संदर्भात जनजागृती केली.
तसेच तालुक्याच्या ३९ सरपंचसरपंचांना एका व्यासपीठावर आणण्यास प्रयत्न केले.
सरपंच भवन उदयास यावे एक हक्काचे भवन दालन तालुक्याच्या ठिकाणी असावे ही संकल्पना आणली आणि ती पूर्ण करण्यासाठी वाटचाल आहे .
आज पूर्ण महाराष्ट्र पथ दिवे वीजबिल शासनाने भरावेत अशी मागणी सरपंच संघटना करते ते सर्वप्रथम म्हसळा सरपंच संघटनांने केले व तसे निवेदन ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ यांस दिले.
कोरोना प्रादुर्भाव वाढता पाहता आपत्तीव्यवस्थापण कमेटी प्रमुख सरपंच असल्याने सरपंचाना जीवनविमा कवच मिळावे म्हणून उपविभागीय दंडा अधिकारी म्हणून आढावा मीटिंग मधे मागणी केली.
भविष्यात म्हसळातालुक्यात सरपंच संघटना प्रभावी करणार व वरिष्ठ सरपंचांसह संभाव्य विकास कामे प्रभावित करण्याचे तडीस जाण्यास प्रयत्न करणार असल्याचे खरसई चे सरपंच आणि सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य म्हसळा तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री निलेश मांदाडकर यांनी म्हसळा लाईव्ह ला सांगितले
إرسال تعليق