राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला आघाडी अध्यक्षपदी सौ. प्राजक्ता चव्हाण यांची निवड मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
रोहा (वार्ताहर)
रायगडचे खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री ना. आदिती तटकरे,आ. अनिकेत तटकरे यांच्या शिफारसीनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस रोहा शहर महिला अध्यक्षपदी शहरातील झुंजार महिला कार्यकर्त्या सौ. प्राजक्ता परशुराम चव्हाण यांची निवड करण्यात आली.
सौ. प्राजक्ता चव्हाण यांना संघटनात्मक कामाचा दांडगा अनुभव असून त्यांनी याआधी देखील शहर अध्यक्षा म्हणून यशस्वीपणे काम केले असून पक्षाच्या प्रदेश व जिल्हा महिला कमिटीवरही त्यांनी काम केलेले आहे.
रोह्याच्या उपनगराध्यक्षा,सभापती,नगरसेविका म्हणून त्यांनी आपल्या कार्यकुशलतेची छाप पाडलेली असून पालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतांना पक्ष नेतृत्वाने त्यांच्याकडे महिला नेतृत्वाची धुरा सोपवली आहे.
रविवारी सुतारवाडी येथे रायगडचे खासदार सुनील तटकरेंच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी आ. अनिकेत तटकरे,रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,उपनगराध्यक्षा रिदवाना शेट्ये,गटनेते महेंद्र गुजर,सभापती महेंद्र दिवेकर,नगरसेवक राजेंद्र जैन,नगरसेविका शिल्पा धोत्रे,तालुका महिला अध्यक्षा प्रितम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सौ. प्राजक्ता चव्हाण यांनी येणाऱ्या काळात शहरातील महिला पक्ष संघटना आधिक बळकट करण्याच्या द्रुष्टीने संघटनात्मक बांधणी करण्याचा निर्धार व्यक्त केला व आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल पक्षनेतृत्वाचे आभार व्यक्त केले.
सौ. प्राजक्ता चव्हाण यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस रोहा शहर महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रोह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
إرسال تعليق