मकरंद जाधव-बोर्लीपंचतन
राज्यात कोरोना महामारी विरोधातील लढाई अत्यंत जिद्दीने लढली जात असून यामध्ये समाजातील विविध घटक आपली सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाग्रस्तांना आपल्या परीने मदतीचा हात देत आहेत.
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकवृंदाने या लढ्यात आपलाही सहकार्याचा हात असावा या सेवाभावी भावनेतुन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा म्हसळा यांचे वतीने म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील कोवीड केंद्राला गुरुवार दि.१७ जुन रोजी रुग्णांना आवश्यक सॕनिटायझर,टाॕवेल टुथपेस्ट टुथब्रश,मिनरल व एनरजेल वाॕटर, ड्रायफ्रुटस् विविध प्रकारची फळं अशा उत्तम प्रतिच्या साहीत्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमप्रसंगी म्हसळा पंचायत समिती सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे,म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँ.अध्यक्ष समिर बनकर,डॉ.अलंकार करंबे,सहाय्यक अधीक्षक विष्णू संबारे,रवी पाटील,केंद्र प्रमुख किशोर मोहिते,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा म्हसळा अध्यक्ष नरेश सावंत सरचिटणीस अण्णासाहेब बिचुकले,जिल्हा उपाध्यक्ष अरविंद मोरे,संघाचे सदस्य श्री.राठोड श्री.माकणे श्री.कंडे,श्रीम. सावंत व इतर सदस्य उपस्थित होते. या वेळी समीर बनकर यांनी आपल्या मनोगतात शिक्षक संघाने अद्यापनाची सेवा देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल सर्व शिक्षकांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिचकुले सर यांनी तर आभार अ.बा.मोरे यांनी मानले.
उत्तम संस्कारातून एक नवी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत एक चांगला आदर्श आपल्या मदतीच्या कृतीतून समाजासमोर ठेवला असून या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
إرسال تعليق