म्हसळ्यातील बरे होण्याचे प्रमाण : आज बाधीत ५ तर बरे झाले १० रुग्ण


म्हसळ्यातील बरे होण्याचे प्रमाण वाढले
म्हसळयातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण ५०१ :आज बाधीत५ तर बरे झाले १०

संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा तालुक्यात कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ५०१ झाली, आज नवीन पॉझीटीव्ह रुग्ण ५ सापडले त्यामध्ये १ म्हसळा,२ रुग्ण वरवठणे,बनोटी व चाफेवाडी येथील प्रत्येकी एक आहे. आज मयत झालेल्या मध्ये एक ५०वर्षीय एक महीला आहे.४७ बाधीत रुग्णांपैकी २४जण घरीच विलगीकरण राहून उपचार घेत आहेत तर १६जण श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय, २ माणगाव उपजिल्हा रुग्णालय,तर ४खाजगी रुग्णालयांत व १ कोव्हीड केअर सेंटर जसवली मध्येउपचार घेत आसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यानी कळविले आहे.तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.४२% आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा