टीम म्हसळा लाईव्ह
भारतीय हवामान खात्याकडून पुर्व-मध्य अरबी समुद्रात दि. १४ ते १६ मे, २०२१ दरम्यान राज्यातील समुद्र किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
समुद्रकिनारपट्टरीवर हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याने रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी असलेल्या गावाठिकाणी व परिसरात खबरदारी म्हणून सर्व तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले आहे.
तसेच, वेगाने वारे, विजेच्या कडकडाटासहीत वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने पाऊस पडत असतांना नागरीकांनी घराबाहेर किंवा मोकळ्या जागेत जाऊ नये. त्याचप्रमाणे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नागरीकांनी बोटींसह तात्काळ परतण्याच्या सुचना दिल्या आहेत. तरी सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
إرسال تعليق