कोरोनावर मात करून पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे आपल्या कर्तव्यावर रूजू



तळा(किशोर पितळे)
तळा पोलिस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे या कोरोना योध्दयाला कोरोना झाला होता.ईच्छाशक्ती व प्रतिकारशक्ती बळावर१५मे रोजी कोरोना वर मात करून ठणठणीत बरे होऊन सुखरूप घरी आले.१५ रोजी तळा पोलिस ठाणे येथे आपल्या सेवेतील कर्तव्यावर रूजू झाले आहेत. रायगड जिल्ह्यात तळा तालुका हा दुर्गम डोंगराळ तालुका म्हणुन ओळखलाजातो.सुरवातीस हा तालुका कोरानामुक्त होण्याच्या मार्गावर होता परंतु मधल्या काळात लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल झाल्यानंतर कोरोना पाॅजेटीव्ह रुग्ण आढळुन आल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले होते.मात्र तालुक्यातील प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज असल्याने लाॅकडाऊचे पालन नियमितपणे करण्यात आले.ज्या व्यक्तींना कोरोना विषाणुचीबाधा झालीहोती तेरुग्णउपचारानंतर पुर्ण पणे बरे झाले आहेत.केवळ १५ रुग्णावर सध्या उपचारसुरुअसल्याने तळेवासियांना दिलासा मिळाला असुन शासनाचे नियम पाळत कोरोनावर मात करण्याचे आवाहन प्रशासन आणि पोलीस यंत्रणे मार्फत करण्यात येत आहे.या काळात कोरोना योध्दा म्हणून आपली सेवा देत असताना या कोरोना योध्द्याला कोरोना झाल्याचे लक्षणे जाणवू लागल्याने कोरोना विषाणू चाचणी करण्यात आली. कोरोना पाँझेटिव्ह रिपोर्ट १मे रोजी निष्पन्न झाले होते त्यानंतर त्वरीत या कोरोना योध्द्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांच्यावर उपचार करून बरे होऊन ते ७ मे रोजी घरी आले.प्रकृती ठीक झाल्यानेडॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा कोरोना योध्दा१५मे रोजीतळापोलिस ठाणे येथे आपल्या कर्तव्यावर रूजू झाले आहेत. यावेळी तळा पोलीस ठाण्याच्या सहा.पो.नि.सोनाली जावडे,प्रियंका वंजारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात पुष्प देऊन व पुष्पवर्षाव करून स्वागतकेले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा