ताउक्ते चक्रीवादळ - आ.अनिकेत तत्कारेंच्या प्रयत्नाने म्हसळा दिघी रस्ता तत्काळ खुला:महाकाय वृक्ष पडल्याने झाला होता बंद

सोबत फोटो- म्हसळा – दिघी रोड येथे चक्रीवादळा मध्ये महाकाय वृक्ष पडून रस्ता बंद झाला होता.यावेळी आ,अनिकेत तटकरे यांनी स्वतः उपस्थित राहून जेसीबीच्या सहायाने झाड बाजूला काढताना दिसत आहे.छाया-निकेश कोकचा


म्हसळा(निकेश कोकचा)
रविवारी रात्री उशिरा ताउक्ते वादळाचा फटका रायगड किनारपट्टीला बसला असून या वादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आ.अनिकेत तटकरे यांनी सोमवारी म्हसळा तालुक्याचा दौरा केला.या दौऱ्यात असताना म्हसळा दिघी रोड येथे पडलेला महाकाव्य वृक्ष  स्वत उभे राहून बाजूला करून घेतला व रस्ता मोकळा केला.
हवामान खात्याकडून ताउक्ते चक्रीवादळाची पूर्वसूचना जाहीर करण्यात आली होती.या सूचनेच्या आधारावर प्रशासन व लोक प्रतिनिधी एकमेकांच्या संपर्कात राहून रात्रभर काम पाहत होते.ताउक्ते चक्रीवादळाची पूर्व सूचना मिळाल्या पासून स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ.अनिकेत तटकरे म्हसळा,तळा व श्रीवर्धन येथील नागरिक व स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात होते.
रायगड जिल्ह्यात चक्रीवादळाचा जोर हा रात्रीच्या वेळेस असल्याने,सोमवारी सकाळी चक्रीवादळाचा जोर कमी झाल्यावर आ.अनिकेत तटकरे हे तत्काळ  म्हसळा दौऱ्यावर आले.आ.तटकरे यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर म्हसळा पंचायत समिती येथे सभा घेऊन माहिती घेतली.या सभेमध्ये जिल्हा परिषद सभापती बबन मनवे,राष्ट्रावादीचे तालुका अध्यक्ष समीर बनकर,तहसीलदार शरद गोसावी,गट विकास अधिकारी प्रभे,स.पो.नि सुर्वे व महावितरणाचे अधिकारी उपस्थित होते.


नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.कोरोना आणि चक्रीवादळ या दुय्यम परिस्थिती मध्ये नागरिकांना कोणत्याही अडचणी भासल्यास  ठेत माझ्या मो.९८६७७००००६ या क्रमांकावर संपर्क करू शकता- आ.अनिकेत तटकरे 



Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा