रोहा अष्टमी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती मयूर दिवेकर यांच्या प्रयत्नातून फोरस्टार रिसॉर्ट कोव्हिड केअर सेंटर साठी मोफत देणार



रोहा अष्टमी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती मयूर दिवेकर यांच्या प्रयत्नातून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले फोरस्टार रिसॉर्ट कोव्हिड केअर सेंटर साठी मोफत देणार 

रोहा (प्रतिनिधी)

महाराष्ट्रातील हॉटेल व रिसॉर्ट उद्योगातील नामांकित सिको ग्रुपचे  रोहे तालुक्यातील ढोकळेवाडी (दुरटोली)येथील 5 एकर जागेमधील उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेले फोरस्टार रिसॉर्ट कोव्हिड केअर सेंटरसाठी मोफत देण्यासाठी तयार आहेत, त्यासाठीचा पत्रव्यवहार सिको ग्रुप तर्फे रायगडचे खा. सुनिलजी तटकरे साहेब,पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे,कोकण स्थानिक स्वराज्य संस्था आमदार अनिकेतभाई तटकरे ,जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने,तहसीलदार कविता जाधव यांच्यामध्ये सुरू आहे. 
रोहे अष्टमी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती तसेच सिको ग्रुपचे एक संचालक श्री.मयुर दिवेकर यांच्या कल्पनेतून व स्तुत्य पुढाकारातुन सिको ग्रूप ने हा निर्णय घेतला आहे. सिको ग्रुपचे सर्वेसर्वा अमितभाई ढोलकीया, देवदत्त कपाडिया, सोहेल कपाडिया यांनी सदर संकल्पना तत्काळ मान्य केल्याने त्यांचे सुद्धा मयूर दिवेकर यांनी आभार मानले.












कोरोनाची दुसरी लाट सध्या राज्यात व रायगड जिल्ह्यामध्ये जोरात सुरू असून तिसऱ्या लाटेसाठी देखील यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
अशावेळी सिको ग्रुपने सामाजिक बांधिलकीचे यथोचित भान ठेवून आपले दुरटोली येथील रिसॉर्टमधील सर्व सोईयुक्त असलेले बॅंक्वेट हॉल व डायनिंग हॉलची जागा कोव्हिड केअर  सेंटरसाठी मोफत देण्याची तयारी दर्शविली आहे. सदर जागेत किमान 100 ते 150 बेडचे कोविड केयर सेंटर उभारले जाऊ शकते. 


यापूर्वी देखील आरोग्य सभापती मयूर दिवेकर यांनी व्यक्तिगत पातळीवर तसेच रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल च्या माध्यमातून कोरोना च्या कठीण काळात अत्यंत प्रभावी काम केले. या मध्ये उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर चे दोन संच, डिस्पोज़ेबल गाऊन, पीपीई किट्स, fabiflu गोळ्या, सॅनिटायझर, गायत्री मंत्र मशीन,लसीकरणाला आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी प्लास्टिक खुर्च्या आदी उपयुक्त साहित्याचे वाटप,दोन वेळा रक्तदान शिबिर तसेच गरजू रुग्णांना ऍम्ब्युलन्स तसेच बेड उपलब्ध करून देणे, रुग्ण बरे होऊन येईपर्यंत त्यांची विचारपूस करून लागेल ती मदत करणे, कोरोनाच्या कठीण काळात अन्नधान्य वाटप करून गरजवंत नागरिकांना मदत करणे, अनेक नागरिकांना या कठीण काळात आर्थिक साहाय्य करणे इ.अनेक कार्य केले त्याचा कोरोनाशी मुकाबला करताना मोठा उपयोग झाला. त्याच प्रमाणे रोटरी च्या माध्यमातून नुकताच लसीकरण केंद्राला लसीकरण लवकर होण्यासाठी सी पी यु संच भेट दिला. सद्य स्थितीची गरज ओळखून आरोग्य सभापती मयूर दिवेकर यांनी घेतलेल्या या कोविड केअर सेंटरच्या निर्णयाचे देखील रोहे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास तो कोरोनाबाधित रुग्णांना नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.






Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा