ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड




म्हसळा प्रतिनिधी

सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने  २१ मार्च ते २५ मार्च २०२१ रोजी गुजरात     येथे होणाऱ्या  ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून रायगडच्या आरूष नित्तूरे व अश्विन प्रभू यांची निवड करण्यात आली आहे.नुकत्याच मुंबई येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेतून दोघांची निवड झाल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल रायगड सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षा तथा पनवेल मनपा नगरसेविका सिताताई पाटील,सचिव स्वप्नील वारंगे,खजिनदार हेमंत पयेर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी आरुष आणि अश्विन यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा