म्हसळा (बाबू शिर्के)
जागतिक महिला दिनानिमित्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हसळा प्रकल्पात महिलांना आरोग्य व कायदे विषयक सल्ला शिबिर भरवण्यात आले होते.महिलांना आरोग्य व कायदे विषयक प्रशिक्षण घेऊन गरोदर माता, स्तनदा माता,आहार, वजन वाढीचे महत्व, कुपोषण कमी करणे व महिलांना कायदेविषयक ज्ञान देण्याच्या उद्देशाने हे शिबीर आयोजित केल्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे यांनी यावेळी स्पष्ट केले.तर गट विकास अधिकारी वाय ए प्रभे यांनी महिलांना महिला गटाचे महत्व, आर्थिक नियोजन,संघटन, महीला सक्षमीकरण विषयी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रम प्रसंगी म्हसळा पंचायत समिती सभापती उज्वला सावंत, उपसभापती मधू गायकर, ऍड मुकेश पाटील, सहायक गटविकास अधिकारी राजेश कदम, विस्तार अधिकारी एच परकाळे, सुनिल गायकवाड, पी एम गायकवाड, वैष्णवी कळबासकर, दीपाली पालवे, रेणुका पाटील, अरविंद बैनवड, कल्पेश पालांडे, अंगणवाडी सेविका आणी बचत गटाच्या सेविका उपस्थित होत्या. सदर शिबिरात सभापती उज्वला सावंत, उपसभापती मधू गायकर आणी ऍड मुकेश पाटील यांनी सुद्धा महिलांना मार्गदर्शन केले.
إرسال تعليق