हापूस आंबा उत्पादक व विक्रेत्यांनी नोंदणीसाठीजिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयास दि.10 मार्च रोजी भेट द्यावी


हापूस आंबा उत्पादक व विक्रेत्यांनी नोंदणीसाठी

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयास दि.10 मार्च रोजी भेट द्यावी                                                         -जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले

टीम म्हसळा लाईव्ह
 हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन (GI Patent) मिळाले असून  त्यानुषंगाने सर्व हापूस आंबा उत्पादक व विक्रेते यांनी त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. याकरिता हापूस आंबा उत्पादक व विक्रेत्यांनी  दि.10 मार्च, 2021  या दिवशी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक व विक्रेते शेतकरी बांधवाना केले आहे.

      रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संबंधित नोंदणी रत्नागिरी येथील कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रते सहकारी संस्था मर्यादित, या संस्थेच्या कार्यालयात करावयाचे आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रत्नागिरीपर्यंत जाण्याचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक बाणखेले यांनी पुढाकार घेऊन कोकण हापूस आंबा उत्पादक व उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित यांच्या पदाधिकाऱ्यांना रायगड जिल्ह्यातील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय येथे दि.9 फेब्रुवारी, 2021  या दिवशी आमंत्रित केले आहे. त्या दिवशी जिल्हा कृषी कार्यालयात आंबा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी लागणारे फॉर्म भरून घेऊन संपूर्ण प्रक्रिया तात्काळ करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती बाणखेले प्रयत्नशील आहेत. याकामी त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे, संचालक डॉ. अर्चना पाटील व  डॉ. जगन्नाथ पाटील यांनी दिले आहे.

      तरी सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या हापूस आंबा लागवड असलेल्या जमिनीचे 7/12 चे (मागील 3 महिन्यातील) उतारे,  बागेच्या जमिनीचा नकाशा (मूळ अभिलेखाची झेरॉक्स ज्यावर बागेतील कलमांची संख्या, विहीर किंवा बोरवेल, घर, वीज जोडणी  यापैकी जे असेल ते हाताने नोंद करून चालेल किंवा पूर्ण हाताने काढलेला पण चालेल), मतदार ओळखपत्राची सत्यप्रत किंवा ड्रायव्हिंग लायसन्स ची सत्यप्रत, 1 फोटो व  रुपये 2 हजार 10 चा “कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित” या संस्थेच्या नावाने धनादेश किंवा रोख रक्कम घेऊन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, रायगड  वेश्वी, अलिबाग येथे बुधवार दि.10 मार्च 2021 रोजी सकाळी ठीक 9.30 ते 11.30 वाजता उपस्थित  राहावे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.विवेक भिडे व जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले  हे शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत, तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कृषी कार्यालय व डॉ.संदेश पाटील (9158752426), सुरेंद्र भंडारी (9423377038),डॉ. जगन्नाथ पाटील (9823436871), वरूण पाटील (9922766555) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी कळविले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा