तळा(किशोर पितळे)
राज्यात कोरोना विषाणूच्या पुन्हा वाढत चाललेल्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सर्वत्र मास्क वापरणे अनिवार्य करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्या अनुषंगाने तळा नगरपंचायतीने तळा शहरात सर्व नागरिकांना मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. त्यासाठी नगरपंचायतीमार्फत तळा शहरात माईकद्वारे सूचना देण्यात येत आहेत. ज्यामध्ये सर्व नागरिकांनी मास्क लावणे अनिवार्य आहे. जे नागरिक विनामास्क फिरताना आढळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. विनामास्क फिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ५०० रु. दंडाला सामोरे जावे लागणार आहे.
तळा नगरपंचायत कार्यालयात तहसीलदार ए. एम. कनशेट्टी, पोलीस निरीक्षक एस. गेंगजे, प्रभारी मुख्याधिकारी खेडेकर यांनी कोरोनाबाबत उपाययोजना करण्यासाठी घेतलेल्या बैठकीत हॉटेल, पान टपरी, रेस्टॉरंट, मिनिडोअर, रिक्षा, शौचालय तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सॅनिटाइझर फवारणी करणे अनिवार्य आहे तसेच आशा ठिकाणी गर्दी करणे टाळावे असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे तळावासियांना आता कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे अन्यथा दंडाला सामोरे जावे लागणार आहे.
إرسال تعليق