म्हसळा वार्ताहर :- महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटनेच्या मान्यतेने रायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस संघटनेच्या वतीने सोमवार दि १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्कूल खारघर येथे निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.यातून जळगाव येथे दि १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सब ज्युनिअर व सिनियर राज्य स्पर्धेसाठी संघ निवडण्यात येणार आहे.सब ज्युनिअर साठी १ जानेवारी २००६ नंतर जन्मलेले खेळाडू पात्र आहेत.निवड चाचणीकरिता खेळाडूंनी ओळखपत्र,आधार कार्ड घेऊन उपस्थित राहावे.अधिक माहिती साठी रायगड सॉफ्ट टेनिस संघटनेचे सचिव स्वप्नील वारांगे ९८२१८९९८७२, खजिनदार हेमंत पयेर ९८६०६०१७३६ अथवा स्पर्धा प्रमुख मंदार मुंबईकर ८०८०४३१०४५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
जिल्हा सॉफ्ट टेनिस निवड चाचणीचे आयोजन
Admin Team
0
إرسال تعليق