नद्या इतिहास घडवतात, त्यांचे पावित्र्य राखले गेलेच पाहीजे-खा. शरदचंद्र पवार



रोहे (निखिल दाते)
नद्या इतिहास घडवतात, गावाला वेगळी ओळख मिळवून देतात त्यांचे पावित्र्य जपले गेलेच पाहीजे असे मनोगत देशाचे माजी क्रुषिमंत्री खा. शरदचंद्र पवार यांनी रोह्यात व्यक्त केले.
रोहे अष्टमी नगरपरिषदेच्या कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा देशाचे क्रुषिमंत्री खा. शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते .
दोन वर्षांपूवी या प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने रोह्यात आलो होतो त्यावेळी खा. सुनिल तटकरेंनी या प्रकल्पाविषयी माहीती दिली होती आज हा प्रकल्प अगदी त्याच पद्धतीने पुर्ण झाल्याचे गौरवोद्गार खा. शरदचंद्र पवार यांनी यावेळी काढले .
नद्या आपल्या प्रवाहाने प्रेरणा देतात, शहराला वेगळी ओळख देतात परंतु दुर्दैवाने त्या नद्या दूषित करण्याचे काम सर्वत्र सुरु असतांना रायगडचे खासदार सुनिल तटकरेंनी कुंडलिका नदीला पुन्हा योग्य सन्मान मिळवून दिल्याचे खा. शरदचंद्र पवार यांनी आवर्जून  नमूद केले.
कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पातील बगीचे बघून आपल्याला काश्मीर मधील बगीच्यांची आठवण झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
आम्हाला कोकण बदलायचा असुन फलोत्पादन, पर्यटन, मत्स्यव्यवसाय याद्वारे येणाऱ्या काळात कोकण व रायगडचा विकास करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.
तटकरे कुटुंबीयांच्या रूपाने रोहे व रायगडाला द्रष्टे नेतृत्व लाभल्याचे खा. शरदचंद्र पवार यांनी यावेळी सांगितले.
कोरोनासंबंधीच्या सद्य परिस्थितीवर भाष्य करतांना लोकांनी कोरोनासंबंधीची योग्य खबरदारी घेतली  पाहीजे असे आवाहन खा. शरद पवारांनी यावेळी केले.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण रोह्याच्या शिवराज केबलवर दाखवण्यात आल्याने बहुसंख्य रोहेकरांनी घरबसल्या या नेत्रदीपक सोहळ्याचा आस्वाद घेतला.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख आतिथी, देशाचे माजी क्रुषिमंत्री खा. शरद पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष रायगडचे खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ,माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, ज्येष्ठ नेते भास्कर विचारे,जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी आधिकारी किरण पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सह सचिव विजयराव मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकरराव पाटील, , पंचायत समिती उपसभापती रामभाऊ सकपाळ,रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, गटनेते महेंद्र गुजर, सभापती महेंद्र दिवेकर,ज्येष्ठ नगरसेवक समीर सकपाळ,शहर अध्यक्ष अमित उकडे ,प्र. मुख्याधिकारी मानसी साठे,आदींसह सर्व नगरसेवक, नगरसेविका व अन्य मान्यवर उपस्थित होते.

नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी सदर सोहळ्याचे प्रास्ताविक केले, आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कुंडलिका नदीची महती विषद केली व कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्प साकारण्यामागचा उद्देश व भुमिका उपस्थितांसमोर विषद केली.

राज्याच्या राज्यमंत्री तसेच रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील मुद्देसूद भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.
आपल्या भाषणामधून ना. आदिती तटकरे यांनी शरदचंद्र पवार यांचे व पवार कुटुंबियांचे विशेष ऋण व्यक्त केले.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणुन काम करण्याची संधी दिल्याबद्ल त्यांनी त्यांचे आभार व्यक्त करुन मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची विचारधारा जोपासत पुढील कालावधीत आधिक जोमाने काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या मनोगतामधुन सन 2001 पासुन रोह्यात केलेल्या विविध विकासकामांचा उल्लेख करत असताना शरदचंद्र पवार, अजितदादा पवार व सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनामुळेच व भक्कम पाठिंब्यामुळे ही विकासकामे करणे शक्य झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
1989 च्या महापुराच्या वेळी शरदचंद्र पवार दुसऱ्या दिवशी नागोठण्यात गुडघाभर चिखलात धावत आल्याच्या जुन्या आठवणींना खा. तटकरे यांनी यावेळी उजाळा दिला.
कुंडलिका नदीचे पावित्र्य व मांगल्य  वाढवण्याची व जपण्याची आमची जबाबदारी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
पवार व तटकरे कुटुंबियांचे असलेले तीन पिढीच्या अतुट नात्याचा आपल्या मनोगतामध्ये खा. सुनिल तटकरे यांनी आवर्जून उल्लेख केला.

रायगडवासियांच्या वतीने खा. सुनिल तटकरे व अन्य मान्यवरांच्या हस्ते खा. शरदचंद्र पवार यांचा क्रूतज्ञता सन्मान करण्यात आला.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा