माणगाव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची मासिक सभा खेळीमेळीच्या वातारणात संपन्न झाली.
किरण शिंदे /लोणेरे
बुधवार दि.१०/०२/२०२१ रोजी नामदार मनोहर गजानन जोशी विद्यामंदिर नांदवी शाळेत माणगाव तालुका मुख्याध्यापक संघाची सभा श्री विजय पारकर यांचे अध्यक्षतेखाली उत्साही व माहिती पूर्ण चर्चेने संपन्न झाली.
सुरवातीला संघाचे अध्यक्ष श्री विजय पारकर सर,सचिव श्री सोपान बर्गे सर ,संस्थेचे अध्यक्ष श्री विजय सावंत व सचिव श्री विजय बाबा सावंत ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सरस्वती जाधव यांचे हस्ते सरस्वती पुजन व दिप प्रज्वलन करुन सुरवात झाली.सचिव श्री सोपान बर्गे सर यांनी प्रास्ताविक केले.श्री विजय सावंत यांनी त्याचे काळातील अनुभव सांगताना सेवापुस्तकातील नोंदींचे महत्त्व मोजक्या शब्दात उदाहरणासह सांगितले.
स्वागत समारंभ झाल्यानंतर संस्थेचे पदाधिकारी गेले.नियमित सभा सुरु झाली. सभेस तालुक्यातील २६ मुख्याध्यापक उपस्थित होते.उर्वरीत मुख्याध्यापकांनी पुढील सभेस उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष विजय पारकर सरांनी केले.श्री सोपान बर्गे सरांनी.मागिल सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले श्री अर्जुन कुशिरे सरांनी काही दुरुस्ती सुचवून ते सर्वानुमते मंजूर केले.
मागिल जामा खर्च श्री कांबळे बी.आर यांनी वाचून दाखवला तो सर्वांनी मंजूर केला.
श्री महादेव जाधव सर यांनी शाळेतील साधने खरेदी यांच्या नोंदवह्या अद्ययावत करण्याची पद्धत अतिशय खेळी मेळीच्या व सर्वांना समजेल आशी विशद केली.
श्री राजेंद्र पवार सरांनी जिल्हा मुख्याध्यापक संघांचे सभासद होण्याचे आवाहन सर्वांना केले.तसेच सभासद होण्याचे महत्त्व सर्वांना सांगितले. जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मुखपत्र "ज्ञानदर्पण" दि.२४/०२/२०२१ सभेमध्ये प्रकाशित होणार आहे. त्यासाठी तालुका संघाची जाहिरात व पुढील अंकात आपल्या शाळेची,संस्थेची जाहिरात मिळावी असे आवाहन केले.
तालुक्यातील एखाद्या मुख्याध्यापकावर कोणत्याही घटका कडून अन्याय झाला, संबंधिताने संघाकडे तक्रार दिली तर तात्काळ तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक संबंधित मुख्याध्यापक यांचे कडे एकत्र येतील व झालेला अन्याय दुर करण्यासाठी सर्व मुख्याध्यापक संघ त्या मुख्याध्यापकांच्या पाठीशी ठामपणे शंभर टक्के राहिल .असा ठराव श्री राजेंद्र पवार सरांनी मांडला.तो सर्वांनी एकमताने मंजूर केला.शेवटी श्री राजेंद्र पवार सरांनी आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपली.
إرسال تعليق