मकरंद जाधव-बोर्लीपंचतन
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील रोहिदास समाज स्मशानभूमी व बाजूलाच असलेल्या गणेश विसर्जन घाटाची स्वच्छता बोर्लीपंचतन येथील बालवीर क्रीडा मंडळाकडुन श्रमदान करुन करण्यात आली.
बोर्लीपंचतन गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पुलाजवळील रोहीदास समाजाच्या स्मशान शेडभोवताली व नव्यानेच बांधलेल्या गणेश विसर्जन घाटावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे,गवत, प्लास्टिक पिशव्या तसेच गणेश विसर्जन घाट हा रात्रीच्या वेळी मद्यपींचा हक्काचा अड्डा झाल्याने दारुच्या रीकाम्या व फुटलेल्या बाटल्यांमुळे या परीसरामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याचे विदारक दृष्य दिसत होते.या गोष्टीचे गांभीर्य ओळखुन बोर्लीपंचतन येथील बालवीर क्रीडा मंडाळाच्या सदस्यांनी सामाजिक भावनेतुन रोहीदास समाजाच्या स्मशान शेडजवळील परीसर व गणेश विसर्जन घाट स्वतः श्रमदान करुन स्वच्छ केला व गावापुढे स्वच्छतेच्या बाबतीत एक सामाजिक कार्याचा आदर्श ठेवला. तसेच यापुढे जो कोणी स्मशानभूमी व गणेश विसर्जन घाटावर अस्वच्छता पसरवेल व मद्य पिताना आढळेल त्या व्यक्तिंवर कडक कारवाई बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीने करावी अशी मागणी देखील बालवीर मंडळाकडून करण्यात आली आहे.बालवीर क्रीडा मंडळाच्या या सामाजिक कार्याचे समाजाकडुन कौतुक होत आहे.
إرسال تعليق