नैसर्गिक आपत्तीत नुकसान ग्रस्त शाळा इमारत दुरुस्ती करिता म्हसळा तालुक्यासाठी 78 लक्ष रुपयांची मंजुरी.


नैसर्गिक आपत्तीत नुकसान ग्रस्त शाळा इमारत दुरुस्ती करिता म्हसळा तालुक्यासाठी 78 लक्ष रुपयांची मंजुरी.
रायगड जिल्हा परिषदेच्या 40 शाळा कात टाकणार!

म्हसळा -वार्ताहर

देशात आणि राज्यात गेले वर्ष भर कोरोना प्रादुर्भाव चालु असताना माहे 3 जुन 2020 रोजी निसर्ग चक्री वादळाने थैमान घातले आणि होत्याचे नव्हते केले. निसर्गाने निसर्गाला मारलेच पण निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या प्राणी मात्राचेही जनजीवन विस्कळीत केले.वेध शाळेच्या आगावू सूचनेनुसार आणि महाराष्ट्र शासनाने वेळीच दखल घेतल्याने फारसी जीवित हानी झाली नाही परंतु वित्त हानीचा काही हिशोब लागला नाही या मध्ये शाळा आल्याच.निसर्ग चक्री वादळाचा म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी आणि उर्दु मिळुन 40 शाळांची मोठया प्रमाणात वित्तहानी होऊन काही अंशतः तर काही जास्त प्रमाणात नादुरुस्त झाल्या होत्या. शाळा इमारती पुन्हा उभारण्यासाठी शासन स्तरावर जोरदार हालचाली सुरू असताना रायगड जिल्हा परिषद अलिबाग प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांस प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार म्हसळा तालुक्यातील 40 प्राथमिक शाळा दुरुस्ती करणे कामी (91) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च(अनिवार्य)31,सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)2245,2461 अन्वये 78,87,786 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.सदरची निधी निसर्ग चक्रीवादळामुळे बाधीत झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधींमधून मंजुर करण्यात आलेल्या निधीच्या मर्यादेत प्रति शाळा दोन लाख रुपयांची अंदाजपत्रकिय रकमेची तरतूद केली आहे.शाळा दुरुस्ती करणे कामी म्हसळा तालुक्यातील 40 शाळांना राजीप शिक्षण विभागाने निधीची उपलब्धता केली असल्याने आता नादुरुस्त शाळा कात टाकतील असे चित्र दिसत आहे.शाळा दुरुस्ती करणे कामी शासनाच्या मार्फत तातडीने निधी उपलब्ध करण्यासाठी खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री अदिती तटकरे यांनी लागलीच पाठपुरावा केल्याने मोठया प्रमाणात आवश्यक निधी उपलब्ध झाला आहे.तालुक्यातील चिखलप आदिवासीवाडी,पाभरे,म्हसळा,मेंदडी मराठी,खरसई मराठी, तुरुंबाडी,कांदलवाडा,मेंदडी कोंड,साळवींडे,म्हसळा उर्दु, गोंडघर,खारगाव बुद्रुक,संदेरी उर्दु, आंबेत उर्दु,ठाकरोली,वरवठणे मराठी,पाष्टी,खामगाव,चिचोंडे,कोलवट,बागाचीवाडी,म्हसळा आदिवासीवाडी,वारळ,मारियमखार,वरवठणेउर्दु,मेंदडीउर्दु, कणघर,तोंडसुरे, तोरडी उर्दु, चिराठी, गोंडघर उर्दु,ढोरजे, पानवे,घुम,तोराडी,रुद्रवट या 37 शाळांसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर कोळवट मराठी शाळा दुरुस्तीसाठी 163812 रुपये गायरोने 185300 आणि कुडगाव कोंड शाळेसाठी 138674 रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा