15 फेब्रुवारी पासून म्हसळ्यात क्रिकेटचा महासंग्राम ; दद्दु बॉईज तर्फे म्हसळा प्रीमियर लीगचे नियोजन



म्हसळा (बाबू शिर्के)

श्रीवर्धन आणी म्हसळा तालुका टेनिसबॉल क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जातो.याच क्रिकेटच्या पंढरीत दद्दु बॉईज आयोजित म्हसळा प्रीमियर लीग येत्या सोमवार दिनांक 15 पासून म्हसळा पाभरे रस्त्यावरील जानसई नदीच्या बाजूस दिवसतरात्र क्रिकेटचा महासंग्राम बघायला मिळणार आहे.
                           ही क्रिकेटची स्पर्धा 15, 16, 17 आणी 18 तारखेपर्यंत दिवसरात्र खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत दोन पोल खेळवले जाणार आहेत.पहिल्या पोल मध्ये प्रत्येक गावतले स्थानिक खेळाडू खेळतील तर दुसऱ्या पोल आयपीएल पद्धतीने खेळवला जाणार आहे.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एक लाख रुपये आणी आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक पन्नास हजार रुपये तर तिसऱ्या आणी चोथ्या नंबरला प्रत्येकी दहा हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहेत. तसेच इतर उत्तेजनार्थ बक्षीस सुद्धा आयोजित केले आहेत. या सामन्यांचे आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील युवा खेळाडू आणी क्रिकेट प्रेमींनी आनंद घ्यावा असे आव्हान आयोजक असल कादरी आणी इर्शाद धायरेकर यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा