अल हमद हॉस्पिटल म्हसळा च्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन



टीम म्हसळा लाईव्ह

कोरोना काळात नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी नववर्षाच्या सुरुवातीलाच दिनांक १० जानेवारी २०२१ रोजी खरसई स्थळ आगरी समाज खरसई (अरुण माळी घराजवळ) येथे अल हमद हॉस्पिटल म्हसळा च्या वतीने व डॉ. मुस्ताक मुकादम, नाजली मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबीर चे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराचे उदघाटन खरसई गावचे सरपंच श्री निलेश मांदाडकर यांच्या हस्ते करण्यात आले असून सुरुवातीपासूनच नागरिकांचा या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सदर शिबीर आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असून परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.  

हे आरोग्य शिबिर डॉ. स्मित पटेल, डॉ. श्वेता भुवड आणि डॉ मुब्रीज मुकादम, तसेच नर्स उज्वला वायकर, प्रणाली सावंत व सर्फराज दफेदार यांच्या विशेष सहकार्याने होत आहे.


Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा