तालुक्यात अवकाळीपावसाची हजेरी ; बळीराजा आर्थिक संकटात


तळा तालुक्यात अवकाळीपावसाची हजेरी ; बळीराजा आर्थिक संकटात.२०२०साल झाले विषसाल.

तळा(किशोर पितळे)
सन २०२० साल हे कलियुगातील विष साल झाले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोरोना महामारी, लाँकडाऊन, जागतिक आर्थिक मंदी, निसर्ग चक्रीवादळ, लहरी हवामान, लहरी बेसुमार पाऊस, आणी भर थंडीत अवकाळी पाऊस आज (दि.११) पहाटे पाच वा.पावसाने रिमझिम पाऊस पडण्यास सुरूवात केली जवळपास आठ वाजे पर्यंत पडत असल्याने रब्बी हंगामातील कडधान्ये, वाल मूग, मटकी, हरभरा,भाजी पाला कलिंगड यामधून आर्थिक हातभार लागेल या आशेवर बळीराजा होता. मात्र आता या लहरी हवामानाने अवकाळी पावसाने पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पाऊस झाल्याचे संदेशामुळे समजण्या येत आहे त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या महीन्यात देखील निसर्गाने पुन्हा आपले डोळे वटारले असून या कलियुगात अजून काय काय घडेल अशी सर्वांना चिंता पडू लागली आहे.या हवामानामुळे आरोग्य धोक्यात येईल की काय अशी काळजी वाटू लागली आहे.आज तहसील कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहिती नुसार नऊ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.



Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा