म्हसळा युवासेना शहर अधिकारीपदी कौस्तुभ करडे यांची तर उपशहर अधिकारीपदी राहुल जैन यांची निवड



म्हसळा (बाबू शिर्के)
युवासेना दक्षिण रायगड जिल्हा अधिकारी विकास गोगावले यांच्या आदेशाने म्हसळा शहरातील कट्टर शिवसैनिक कौस्तुभ करडे यांची शहर अधिकारीपदी तर राहुल जैन यांची उपशहर अधिकारीपदी निवड करण्यात आली.  रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद थरवळ यांचा हस्ते दोघांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी श्रीवर्धन मतदार संघ क्षेत्र संघटक रवी लाड, माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के, युवासेना तालुका अधिकारी अमित महामुनकर, बाळा म्हात्रे महिला आघाडी प्रमुख रीमा महामुनकर, छाया म्हात्रे, दीपा कांबळे उपस्थित होते.कौस्तुभ करडे आणी राहुल जैन यांचा रूपाने सच्चा शिवसैनिकाला न्याय मिळाला, अशी भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली. म्हसळा शहरात युवासेनेचे पक्ष संघटन बळकट करण्यावर भर देणार आहे.तसेच आगामी नगर पंचायत निवडणुकीत युवासेनेच्या माध्यमातून यश संपादन करणार असल्याचर असे कौस्तुभ करडे यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा