म्हसळा (बाबू शिर्के)
मुदत संपूनही कोरोनामुळे रखडलेल्या रायगड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत.त्या अनुषंगाने म्हसळा तालुक्यातील सर्वात मोठी समजली पाभरे, केलटे आणी लिपनीवावे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान तर 18 जानेवारी 2021रोजी मतदान मोजणी होणार आहे.त्यासाठी शुक्रवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे.या सर्व ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत स्वीकारली जातील.शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देश स्वीकारले जाणार नाहीत.छाननी 31 डिसेंबर रोजी होईल.नामनिर्देशपत्रे 4 जानेवारी पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येतील. मतदान 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.मतमोजणी 18 जानेवारी रोजी होईल. विधानसभा मतदार संघाची 25 सप्टेंबर ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.त्या नुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या नुसार अंतिम मतदारयाद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
إرسال تعليق